४७ वर्षीय प्रवीण पाचोरे ठरले सांगलीचे पहिले सुपर रँडोनिअरिंग
प्रतिनिधी / सांगली
स्पर्धेत भाग न घेताही दिलेल्या वेळेत अंतर व वेळेचे उद्दिष्ट गाठण्याचा अनोखा उपक्रम असलेल्या बीआरएम प्रकारात जगभरातील सायकलपटू सहभागी होत असतात. सांगलीतील प्रवीण पाचोरे यांनीही या स्पर्धेत भाग घेत ६०० किलोमीटरचे अंतर ३६ तासांत पूर्ण करून जिल्ह्याचे पहिले “सुपर रैंडोनिअरिंग होण्याचा मान मिळविला.
फ्रान्समधील अॅडॉक्स क्लब पॅरिसिअन ही संस्था सायकल टूरिझमला प्रोत्साहन देते आणि ‘बीआरएम’चे आयोजनही करते. प्रत्येक देशात कोणतीही संस्था त्यांच्याशी संलग्न होऊन हा कार्यक्रम राबवित असते. एका वर्षात दोनशे, तीनशे, चारशे व सहाशे किलोमीटरचे अंतर दिलेल्या वेळेत पूर्ण करणाऱ्या सायकलपटूला रँडोनिअरिंग हा किताब दिला जातो. सांगली जिल्ह्यातून यापूर्वीही अनेकांनी यात सहभाग घेतला, मात्र यात पाचोरे यशस्वी झाले. हा बहुमान मिळविणारे पाचोरे जिल्ह्यातील पहिले सायकलपटू ठरले. त्याबाबतची नोंद पुणे रैडोनिअरिंगच्या यादीत करण्यात आली आहे.
पाचोरे यांना ६०० कि. मी. अंतरासाठी ४० तासांचा वेळ दिला होता. पुण्यातून त्यांनी सुरुवात केली. पुणे ते कागल तिथून पुन्हा पुणे, लोणावळा करीत पुन्हा पुण्यात यायचे होते. हे अंतर त्यांनी ३६ तास ३० मिनिटांत पूर्ण केले. त्यानंतर त्यांना सुपर रैंडोनिअरिंगचा किताब देण्यात आला. पाचोरे यांच्या पाठोपाठ सांगलीचेच सायकलपटू हर्षद देशमुख यांनी सुपर रँडोनिअरिंगचा किताब मिळविला. दोन सायकलपटूंनी ही कामगिरी यशस्वीपणे पूर्ण केली. पाचोरे यांचे वय सध्या ४७ वर्षे असून त्यांनी या कार्यक्रमासाठी वर्षभर तयारी केली होती. सायकल पंक्चर होणे, नैसर्गिक अडथळे येणे अशा कोणत्याही गोष्टीसाठी वेळ वाढवून मिळत नाही. स्वबळावर हे अंतर पार केले जाते.
रँडोनिअरिंग, बीआरएम म्हणजे काय?
बीआरएम म्हणजे ‘ब्रिव्हेटस रँडोनिअर मॉडिऑक्स, हे एक फ्रेंच वाक्य आहे. ‘जगभर निर्धारित वेळेत दूरवर रपेटीला जाणारा, असा त्याचा अर्थ होतो. ‘बीआरएम’ हा रँडोनिअरिंगचाच प्रकार आहे. स्वबळावर लांब पल्ल्याचे सायकलिंग करणाऱ्यांना हा किताब मिळतो. यात इतर सायकलपटूंशी कोणतीही स्पर्धा नसते. उद्दिष्टपूर्ती यामध्ये महत्त्वाची मानली जाते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








