प्रतिनिधी / सातारा
सातारा म्हणलं की शांत, निसर्गाचे कोंदण लाभलेला हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. याच साताऱ्यात काही छंद वेडे अवलियाही आहेत. सायकलवरून देश भ्रमण करणारे सातारा शहरातील तुषार भोईटे हे व्यक्तिमत्त्व. यांनी 2018 ला तब्बल 6 हजार किलोमीटर अंतर सायकलवरून पार केले आहे. त्यासह अनेक राईडमध्ये त्यांचा सहभाग असतो. पुढच्या वर्षी ते जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास करून रेकॉर्ड करण्याचा संकल्प केला आहे. कोरोना काळात ते घरातच व सध्या बाहेर दररोज सायकलिंगचा प्रकटीस करतात.
सातारा शहरातील विसावा नाका परिसरात राहणारे तुषार भोईटे यांना लहानपणापासून सायकल चालवण्याचा छंद होता.परंतु पुढे तो सुटला.मात्र, चालक झाल्याने त्यांचे पोट सुटले होते.अन त्याच दरम्यान सातारा येथील अमर सायकलचे आशिष जेजुरीकर यांनी तापळो टूर आयोजित केली होती. त्यात सहभागी होण्याचे ठरवले अन 22 हजार रुपयांची सायकल खरेदी केली.
दोन दिवसांची टूर पूर्ण केल्यानंतर दररोज सायकलिंग करू लागले.सहा महिन्यानंतर बंगलोर येथे रेस होती.त्यात सहभागी घेतला.त्यामध्ये सहावा क्रमांक पटकावला. त्यातून आणखी सायकलिंगची आवड निर्माण झाली. तसेच टुरिंग करतात त्यांचे स्वागत करायचे. त्यांची राहण्याची जेवणाची सोय करायची पुढे त्यांना 25 किलोमीटर साथ द्यायची.सायकल प्रेम सुरू झाले. एमटीबी या सायकल प्रकारातून महाराष्ट्र टीममधून उत्तराखंड येथे आयोजित स्पर्धेत ते सहभागी झाले होते.उत्तराखंड पर्यटन विभागच्यावतीने दरवर्षी रेस आयोजित करण्यात येते. तसेच राजस्थान ते काठमांडू असा सायकल प्रवास केला आहे. त्याची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.राजस्थान ते गोवा अशी ही राईड त्यांनी केली.त्या राईडमध्ये सायकल चालवा तंदुरुस्त रहा असा उद्देश घेऊन ती राईड करण्यात आली.
रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करणार
सायकलमध्ये तीन प्रकार येतात.एमटीबी, रोड, हायब्रीड. 2018 ला 6 हजार किलोमीटर अंतर पार केले त्यावेळी मी रोड सायकल वापरली होती.20 दिवसात करायची होती ती अडचणीमुळे करता आली नाही.22 दिवस लागले.माझी नोंद गिनीज बुक मध्ये व्हावी यासाठी पुढच्या वर्षी कश्मीर ते कन्याकुमारी विदाऊट गिअर सायकल वापरणार आहे.पहिल रेकॉर्ड 24 दिवसाच आहे ते मोडण्यासाठी 17 दिवसात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे तुषार भोईटे यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.









