प्रतिनिधी / इचलकरंजी
सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांचा आत्मदहन आंदोलनात भाजून मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या भोरे समर्थकांनी व त्यांच्या समाजाच्या युवकांनी मृतदेह शवविच्छेदनानंतर रुग्णालयातुन थेट नगरपालिकेत आणला. पालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या दालनात मृतदेह ठेवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला अटकाव केला. त्यामुळे भोरे यांचा मृतदेह पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आला.
पालिकेचे संबंधित अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, त्या गुन्ह्याची एफआरआय प्रत जोपर्यंत हातात देणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी त्यांच्या समाजातील समर्थकांनी भूमिका घेतली.
पालिकेच्या गलथान कारभाऱ्याचा भोरे बळी ठरल्याच्या निषेधार्थ समर्थकांनी पालिकेत शंखध्वनी आंदोलन सुरू केले. रात्री उशिरापर्यंत भोरे यांचा मृतदेह पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आला. या घटनेने पालिका परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









