टॉ यफाइड म्हणजेच विषमज्वर, मुदतीचा ताप असे म्हणतात. हा गंभीर आजारापैकी एक आहे. हा आजार बॅक्टेरियल इन्फेक्शनने होतो. हा आजार शरिरातील अनेक भागात पसरून अवयवांवर प्रभाव टाकतो. त्यामुळे त्यावर वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.
ङया आजाराचे प्रमुख कारण म्हणजे साल्मोनेला एन्ट्रिका सेरोटाइम टायफी बॅक्टेरिया आहे. याशिवाय हा ताप साल्मोनेला पॅराटायफीने देखील होऊ शकतो.
ङहा आजार दूषित पाणी किंवा दूषित खाद्य पदार्थाच्या सेवनातून सहजपणे होऊ शकतो. अंगदुखी, त्वचेवर ओरखडे पडणे, प्रचंड ताप येणे ही त्याची प्राथमिक लक्षणे आहेत.
- विषमज्वर हा आजार एकमेकाला स्पर्श केल्याने होत नाही. पण बाधित व्यक्तीच्या मलमूत्रांत असणार्या बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्यास हा आजार पसरु शकतो.
- विषमज्वराची सुरवात ही सामान्य तापेने होते. याशिवाय अन्य काही लक्षणे असतात, परंतु ती कालांतराने गंभीर होऊ शकतात. यामध्ये अशक्तपणा, पोट दुखणे, उच्च ताप, भूक कमी होणे, शारिरीक थकवा, डोकेदुखी, अतिसार, त्वचेवर ओरखडे पडणे या लक्षणांचा समावेश होतो.
- दुषित खाद्यपदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने साल्मोनेला बॅक्टिरिया हे रक्तप्रवाहात तात्पुरत्या स्वरुपात राहतात. हेच बॅक्टेरिया पुढे पांढर्या रक्तपेशीच्या मदतीने लिव्हर, स्प्लिन आणि
- बोनमॅरोपर्यंत पोचतात. कालांतराने त्याची संख्या वाढत जाते आणि पुन्हा ते रक्तप्रवाहात येतात. यादरम्यान बाधित व्यक्तीला ताप येतो.
- त्यानंतर बॅक्टारिया गॉलब्लेडर, बिलरी सिस्टीम आणि बोवेलच्या लिंफेटिक टिश्यूवर आक्रमण करतात. तेथे त्यांची संख्या वाढत जाते. या आजाराचे निदान मलतपासणीने होऊ शकते. तसेच युरिन, रक्ताचे नमुने, कंप्लीट ब्लड काउंट, ब्लड कल्चर, प्लेटलेटस काउंटने देखील या आजाराचे निदान होते.
- विषमज्वराची तीव्रता ही वयावर अवलंबून आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याचा धोका अधिक राहतो.
- बचाव कसा करावा
आपण प्रदूषित आणि दूषित भागात जात असाल तर तेथे जाण्यापूर्वी
किमान दोन आठवडे अगोदर टॉयफाइड आजारापासून बचाव करणारे इंजेक्शन घ्यावे. दरवेळी हे शक्य नसते. पण खातापिताना स्वच्छतेचे निकष प्राधान्याने पाळावेत.
- पाणी उकळून गार केलेले किंवा फिल्टर केलेले असावे. अन्नही चांगल्या रितीने शिजवलेले आणि गरम सेवन करावे. चुकूनही सुगंधीत बर्फाचा वापर करु नये. कच्ची भाजी किंवा फळ खाण्यापासून दूर राहावे. आहारापूर्वी आपले हात स्वच्छ धुवावेत
- या आजारावरील उपचार हा त्याच्या लक्षणावर आणि तीव्रतेवर अवलंबून आहे. या आजाराची संपूर्ण माहिती घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- विषमज्वर बाधित व्यक्तीचा ताप कमी करण्यासाठी अँटीपायरेटिक औषधी दिली जातात. बॅक्टेरियल इंन्फेक्शनने होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी ऍनलजेसिक औषधी दिली जातात.
- या आजारापासून बचाव करण्यासाठी टायफाइड व्हॅक्सिन हा चांगला उपाय आहे. टायफाइड शॉट
आणि ओरल टायफाइड वॅक्सिन अशा काही लशी या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी उपलब्ध आहेत.
– डॉ. महेश बरामदे