ऑनलाईन टीम / नवी मुंबई
भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधत सामनाचं नाव आता पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करा असा टोला लगावला आहे. संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. याला प्रत्युत्तर देत सामनाने आता नाव बदलून ते पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावं.” असं शेलार म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी आजच्या सामनामध्ये भाजपवर निशाणा साधला आहे. फाळणीचा दिवस विसरु नका ,’ असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकताच होती. पाकिस्ताननिर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती.”, असं खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटलेलं आहे.
यावर प्रत्युत्तर देताना भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, “संजय राऊत यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्याला यश येणार नाही. या देशाचा वेगळा इतिहास लिहिण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना त्यांनी बळ देण्याचा हा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सामनाने आता नाव बदलून टाकावं, सामनाने त्याचं नाव पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावं.” असा ही टोला लगावला आहे.








