तुमच्यात जर ‘ही’ गुणवत्ता असल्यास करा फोन
बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्राचा अलिकडेच प्रदर्शित ‘पगलैट’ चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती लाभली आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळत आहे. याचदरम्यान सान्या स्वतःच्या विवाहावरून चर्चेत आली आहे.
मी सिंगल असून विवाहासाठी तयार आहे. मी नेहमीच स्वतःच्या मित्रमैत्रिणींना यासंबंधी विचारत असते. मी माझ्या आयुष्याच्या जोडीदारासाठी कुठल्या अटी निश्चित केलेल्या नाहीत. कुणीही मिळाल्यास चालेल असे तिने म्हटले आहे.
माझा जोडीदार एक चांगला माणूस असायला हवा. मानसिक आणि अध्यात्मिक स्वरुपात जागृत असायला हवा आणि आमची मानसिकता एकसारखीच असल्यास मी त्याचे कौतुक करेन. जर हे गुण असलेल्या व्यक्तीने मला फोन करावा असे सान्याने म्हटले आहे.
सान्याचा ‘पगलैट’ चित्रपट नेटफ्लिक्सवर 26 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या भावना दर्शविणारा आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रासह सयानी गुप्ता, श्रुति शर्मा, आशुतोष राणा, रघुवीर यादव, शीबा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत.









