सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या सर्व कैद्यांना पॅरोलवर किंवा अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश सर्वेच्च न्यायालयाने दिले आहेत.
दरम्यान, यासाठी देशातल्या प्रत्येक राज्य सरकारला कायदेशीर सचिव व राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्यासह एक उच्चस्थरीय समिती गठित करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.