वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या दुहेरीच्या ताज्या मानांकनात भारताच्या सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने आठवे स्थान मिळविले आहे. त्यांचे मानांकन दोन अंकांनी वधारले आहे.
महिला बॅडमिंटनपटूंच्या एकेरीच्या ताज्या मानांकनात भारताची पी.व्ही. सिंधु 90994 मानांकन गुणांसह सातव्या स्थानावर आहे. चीन तैपैईची तेई झु हिने 108800 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे. पुरूष एकेरीच्या मानांकनात स्पेनचा विद्यमान ऑलिंपिक विजेता व्हिक्टर ऍक्सेलसेन 116779 गुणांसह पहिल्या तर भारताचा के. श्रीकांत 69158 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. अलिकडेच इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीचे जेतेपद मिळविणाऱया सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी यांनी 76708 गुणांसह आठवे स्थान मिळविले आहे.









