प्रतिनिधी / सातारा
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, सातारा व श्री.धीरज पाटील, अपर पोलीस अधीक्षक,सातारायांनी महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेल्या गुटख्याची सातारा जिल्हयामध्ये विक्री होत असल्याने माहिती प्राप्त करुन त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना, श्री.किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाख्या,सातारा यांना दिल्या.
दि.०४/०४/२०२१ रोजी एक इसम बुधवार पेठ सातारा येथे पिकअप जीप क्र. एम.एच.४२ एम/४५१९ मधून हिरा गुटख्याची पोती घेवून विक्री करीता आणणार आहे. बातमी पोलिसांना लागल्याने त्याप्रमाणे सपोनि श्री.रमेश गजें व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक बातमीचे ठिकाणी सापळा लावला असता दिनांक ४/४/२०२१ रोजी सकाळी ०९.३० वा. सुमारास एक इसमाकडून बुधवार नाका येथे हिरा पान मसाल्याची २६ पोती रॉयल तंबाखू ७१७ ची १३ पोती व बोलेरो जीप असा एकूण १०,५२,०६०/- रुपयेचा माल हस्तगत केली आहे.सदरचा माल (गुटखा) महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री करण्यास बंदी असल्याने त्याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन कार्यालय सातारा यांना रिपोर्ट देण्यात आला असून शाहुपूरी पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.









