अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात कालपासून रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली त्याप्रमाणे 8 वाजताच पोलीस प्रशासना कडून शहरातील सर्व दुकाने व्यवसाय बंद करण्यात आली तर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना ही समज देऊन घरी पाठवण्यात आले. काल पहिला दिवस असूनही नागरिकांनी आपली व्यवसाय 7:30 वाजताच आवरा आवरी सुरू केली आणि 8 वाजताच शहरातून पोलीस वाहनातून दुकाने बंद करण्याचे आवाहन होताच सर्व दुकाने बंद झाली.
शहरातील मुख्य चौक राजवाडा मोतीचौक, पोवई नाका, सेवन स्टार मॉल या ठिकाणी पूर्ण शांतता पाहायला मिळाली तर नागरिकांनी गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनची आठवण झाल्याचे बोलून दाखवले.









