प्रतिनिधी / गोडोली
सातारच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे कडून जाहीर निवेदना द्वारे कळविण्यात आले आहे. दि.३ जुलै रोजी ४५० मि.मी. व्यासाची शुध्द जल दाब नलिकेला गळती सुरू झालेने पाणी उपसा बंद करण्यात आला आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा यांचे मार्फत तातडीने पाईप दुरुस्ती काम सुरू करणेत आले असल्याचे सहा. कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे चौगले यांनी सांगितले.
शाहूपुरी, करंजे ,शाहुनगर ,गोडोली विसावा नाका, सदरबझार या भागात दि.४ जुलै रोजी पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तरी उपलब्थ पाणी काटकसरीने वापर करुन प्राधिकरणास सहकार्य करावे.’असे आवाहन पल्लवी मोटे यांनी केले आहे.
Previous Articleजपानमधील वर्ण व वंशवाद
Next Article वीजबिले, बियाणे, खत प्रश्नी राजकीय औदासिन्य








