सातारा / प्रतिनिधी :
कोविड लसीकरणासाठी सातारा जिल्हा सज्ज झाला असून, येत्या शनिवारपासून (दि.16) ही लस देण्यात येणार आहे. त्यामुळे गेले वर्ष संपुर्ण भीतीच्या छायेत घालविलेल्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. ज्या लसीची वाट संपूर्ण देश बघत होता ती आता मिळणार असल्याचे समजताच काहीसे आनंदाचे वातावण सर्वत्र पहावयास मिळत आहे.
आता यापुढील जीवन मुक्तपणे जगता येईल, अशी आशा व्यक्त होत आहे. लस घेतल्यानंतर ही सोशल डिटन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधकारक आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस कोविड नियमांचे पालण करणे बंधनकारक आहे. प्रारंभी जिल्ह्यातील 14 हजार 357 आरोग्य कर्मचारी, अशा (अंगणवाडी) कर्मचारी व 10 हजार ॲपवर नोंदणीकृत नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेतील कोल्ड स्टेरेजमध्ये ही लस ठेवण्यात येणार आहे.
येथील सातारा जिल्हा रूग्णालय, कराड उपजिल्हा रूग्णालय, फलटण उपजिल्हा रूग्णालय, दहीवडी उपजिल्हा रूग्णालय, खंडाळ उपजिल्हा रूग्णालय, महाबळेश्वर उपजिल्हा रूग्णालय, मेढा उपजिल्हा रूग्णालय व पाटण उपजिल्हा रूग्णालयात ही लस देण्यात येणार आहे. याचबरोबर आर्याग्ल हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, माळणी मिशन हॉस्पिटल येथे व पुसेगाव, नागठाणे व तरडगाव येथील प्राथमिक केंद्रांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. प्रारंभी महसुल, पोलीस, शिपाई व सफाई कर्मचारी यांनी कोविड ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. अनिरूध्द आठल्ये (जिल्हा आरोग्य अधिकारी)
कोविड लसीकरणासाठी जिल्हा सज्ज झाला असून, प्रारंभी आरोग्य कर्मचारी, आशा (अंगणवाडी) कर्मचारी व खासगी अशा एकुण 25 हजार जणांच्या नोंदणी झालेल्यांना ही लस देण्यात येणार आहे. एकुण 16 ठिकाणी ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर 28 दिवसांनी संबंधीत नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे.









