सातारा, प्रतिनिधी
कोरोनाच्या युद्धात सध्या सातारा जिल्हा प्रगती करत आहे. सध्या बाधितांचा दिवसाकाठी किमान 20 जण बाधित असा आकडा येत असला तरी मुक्त झालेल्यांचा आकडा त्याहून जास्त आहे. जसे की शनिवारी एकूण 8 जण बाधित सापडले तर एकूण 27 मुक्त झाले आहेत.
संपूर्ण लॉक डाऊन होते तेंव्हा जितकी भीती होती त्याहून ती काळजी शंभर पट वाढली असली तरी मुक्तीचे आकडे पाहून भीती मात्र शंभर पट कमी झाली आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भाग सुद्धा जणू पूर्वपदावर आला आहे.
जिल्ह्यात आज 8 नागरिक कोरोना बाधित
आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये विविध रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या 8 नागरिकांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्णांमध्ये सातारा तालुक्यातील कोडोली येथील 42 वर्षीय पुरुष, वय 17 व 14 वर्षीय युवती, खंडाळा तालुक्यातील लोणंद (आनंदगाव) येथील 38 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील शेलारवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, बावधन नाका वाई येथील 25 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील तुळसण येथील 60 वर्षीय पुरुष महाबळेश्वर तालुक्यातील बेल एयर हॉस्पीटलमध्ये मुळचा चेंबूर मुंबई येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या एकूण 726 झाली असून कोरोनातून 499 ब-या झालेल्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु असणाऱ्यांची संख्या 196 इतकी झाली आहे तर 31 जणांचा मृत्यू झालेला आहे.
शनिवारी दिवसभरात
कृष्णांतुन 8, सह्याद्रीमधून 3, कोरेगाव येथून ( प्रथमच ) 2, बेल एअर पाचगणीमधून 11, खावली सेंटर मधून 1 असे एकूण 25 जणांना दहा दिवसानंतर डिस्चार्ज दिला आहे. यांत कृष्णामधील शनिवारी मुक्त झालेले कराड तालुक्यातील बहुलेकरवाडी येथील 60 वर्षीय् पुरुष, खराडे (हेळगाव ) येथील 55 वर्षीय व 45 वर्षीय महिला, पाटण तालुक्यातील दिवशी येथील 27 वर्षीय पुरुष, जांबेकरवाडी येथील 22 वर्षीय महिला व 2 वर्षाचा बालक, काळेवाडी येथील 46 वर्षीय पुरुष, सळवे येथील 45 वर्षीय महिला, सह्याद्रीमधून कराड तालुक्यातील खराडे येथील 15 युवक, शेणोली स्टेशन येथील 14 वर्षीय युवक, शिंदेवाडी विंग येथील 15 वर्षीय युवक, बेल एअर पाचगणीमधून वाई तालुक्यातील जांभळी येथील 12 वर्षीय युवती, वाई येथील 41 वर्षीय पुरुष व 36 वर्षीय महिला, आनेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, दह्याट येथील 8 महिन्यांची बालिका व 27 वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील अहिरे येथील 24 वर्षीय महिला जावली तालुक्यातील अंबेघर येथील 59 वर्षीय पुरुष, काटावली येथील 29 वर्षीय पुरुष, वाहगाव येथील 34 वर्षीय पुरुष, दापवडी येथील 55 वर्षीय महिला, ग्रामीण रुग्णालय कोरेगावमधून कोरेगाव तालुक्यातील कटापूर येथील 23 व 57 महिला.( कोरेगाव येथून मुक्त होण्याची ही पहिली घटना आहे. ) अश्या ऐकून 27 जणांचा मुक्त होण्यात सहभाग आहे.
169 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
जिल्हा रुगणालय सातारा 23, कृष्णा कराड 27, उपजिल्हा रुग्णालय कराड 17, फलटण 3, कोरेगाव 14, वाई 14,
शिरवळ 7, रायगांव 6, मायणी 21, महाबळेश्वर 14, दहिवडी 19 असे एकूण 169 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
तीन मृत व्यक्तींचे अहवाल तपासणीला
1) फलटण येथील 70 वर्षीय महिलेचा,
2) जावली – गांजे येथील 52 वर्षीय पुरुष
3) वाई तालुक्यातील बावधन येथील 53 वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. ती महिला सुरुवातीपासून ह्दयविकार व फुफ्फुसाचे आजाराची रुग्ण होती. दहा दिवसांपासून घरीच श्वसनाचा त्रास चालू झाल्याने तिला वाई मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये दि. 8 ते 12 जून पर्यंत ती दाखल करण्यात आले होते. त्रास वाढल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालय, सातारा येथे पाठविण्यात आले होते.
त्या महिलेचा मुलगा व सून दहा दिवसांपूर्वी मुंबईहून घरी आले होते. त्या मृत महिलेचा कोविड संशयित म्हणून नमुना पुणे येथे पाठविण्यात आला आहे.
138 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
शनिवारी दिवसभरात 138 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहेत. शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण 726रुग्ण आढळले आहेत. 499जणांना दिलाय डिस्चार्ज 196जणांवर उपचार सुरु आहेत. 31 जणांचा मृत्यु झालेला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








