साताऱ्यात शिवतीर्थावर झाले आंदोलन
सातारा प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर दगडफेक व चप्पलफेकीचेचा तीव्र पडसाद सातारा जिह्यात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सकाळी शिवतीर्थावर एसटी कर्मचाऱ्यांचे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडे मारुन जोरदारपणे निषेध नोंदवला. पोलिसांनी ऍड. सदावर्ते यांची प्रतिमाच जप्त केली.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, प्रभारी महिला अध्यक्षा समिंद्रा जाधव, युवती जिल्हाध्यक्षा पूजा काळे, पश्चिम महाराष्ट्र महिला सरचिटणीस संगिता साळुंखे, विद्यार्थी सेलचे प्रदेश निरीक्षक अतुल शिंदे, युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख, सेवादल प्रदेश संघटिका सीमा जाधव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शफिक शेख, सातारा जावली विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष शशिकांत वाईकर, निवास शिंदे, नलिनी जाधव, उषा पाटील, वैशाली सुतार, नूपुर नारनवर, बाळासाहेब शिंदे, सचिन जाधव, तुषार गुरव, महेश जाधव, सागर पवार, तेजस भोसले, किसन घाडगे आदी उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ऍड. गुणरत्ने यांच्या प्रतिमेला जोडे मारयला सुरुवात केली. पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी लगेच ऍड. गुणरत्ने यांची प्रतिमा ताब्यात घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आपला निषेध सुरुच ठेवला. यावेळी बोलताना सुनील माने म्हणाले, आमचे दैवत शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवर काल ज्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलो आहे. या महाराष्ट्रामध्ये राजकारणात अशी प्रवृत्ती निर्माण झाली नव्हती. ज्या पद्धतीने साहेबांच्या घरावर आंदोलन केले गेले. त्या आंदोलनाच्या मुळाशी जावून या आंदोलनाच्या पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध लागला पाहिजे. कालच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. साहेबांची 60 वर्षाची कारकिर्द बघितली तर विकासासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. आमच्या श्रद्धास्थानावर हल्ले करण्याचे काम काही राजकीय प्रवृत्ती करत आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो आहे.
यावेळी बोलताना संगिता साळुंखे म्हणाल्या, महाराष्ट्र हा शिवरायांचा, शाहु, फुले, आंबेडकरांचा आहे. या सुसंस्कृत महाराष्ट्रात गुणरत्न यांनी जो भ्याड हल्ला केला. तो निषेध करतो आणि सगळ्य़ात महत्वाचे म्हणजे या भ्याड हल्यात एसटी कर्मचारी किती होते. यामध्ये भाडोत्री लोक आणून हा हल्ला केलेला आहे. या हल्याला सामोरे जाण्याचे सामार्थ्य सुप्रियाताई सुळे यांनी रणरागिणीच्या आवेशात भ्याड हल्ला थोपवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला खरच त्यांचा आदर वाटतो. अशा मॉब सायक्लाजीमध्ये काहीही होवू शकतो. या भ्याड हल्याचा निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.