सातारा तालुक्यातला आकडा रोडावला, कराड 27, फलटण 27
उपचार प्रोटोकॉलमध्ये बदल नाही, सेंटर्स पडू लागलेत ओस
प्रतिनिधी / सातारा
कोरोना संकट काही प्रमाणात कमी होत आहे. सातारा जिल्ह्यात विदारक स्थिती होती मात्र आता मुक्ती दर 87.12 वाढला तर मृत्युदर 3.31 पर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यात एकूण बाधित 45 हजार 560 इतके झाले असताना उपचारार्थ रुग्ण केवळ दहा टक्क्यांच्या खाली म्हणजे 9.56 % राहिले आहेत.
दिलासादायक टक्केवारी
सोमवारी जिल्ह्यात जितके उपचारार्थ रुग्ण आहेत त्यापैकी Dchc किंवा dch मध्ये केवळ 1 हजार 141 म्हणजे 26.13 % रुग्ण उपचार घेत आहेत तर घरातल्या घरात उपचार घेत असलेल्यांची आत्ताची टक्केवारी 69.23 इतकी आहे.
जिल्ह्यातील 187 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 6 बाधितांचा मृत्यू
187 बाधितांचे विवरण
सातारा 30
रविवार पेठ 1, गोडोली 3, शाहुपुरी 2, शाहुनगर 1, प्रतापगंज पेठ 1, करंजे पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, अजिंक्य कॉलनी 1, गडकर आळी 1, विसावा नाका 1, संगमनगर 1, मत्यापूर माजगाव 1, बोरखळ 2, गजवडी 1, बोरगाव 1, सर्जापूर 1, किडगाव 1, मालगाव 1, देगाव 1, जकातवाडी 1, देगाव फाटा 1, किन्ही 2, वाढे 1, नागझरी 1, पिंपळवाडी 1,
कराड 27
कराड 11, मंगळवार पेठ 1, विद्यानगर 1, कोळे 1, आगाशिवनगर 1, चरेगाव 1, किन्हई 1, कार्वे नाका 2, तळबीड 1, येळगाव 1, येरवळे 1, शेरे 2, घोगाव 1, मलकापूर 1, गोंदी 1,
फलटण 26
फलटण 1, गोळीबार मैदान 1, हिंगणगाव 1, ताथवडा 9, मठाचीवाडी 1, तरडफ 1, बिबी 1, ढवळ 1, साखरवाडी 2, शिंदेवाडी 1, वाठार निंबाळकर 1, विढणी 1, निरगुडी 3, खटकेवस्ती 2
वाई 10
रविवार पेठ 1, सुरुर 1, पसरणी 3, धोम 3, भुईंज 1, आसले 1.
खटाव 20
वडूज 8, सिध्देश्वर कुरोली 2, गोपूज 1, वर्धनगड 1, नेर 1, विसापूर 2, पुसेगाव 2, सिध्देश्वर 1, कुरोली 1, मायणी 1,
माण 13
बिदाल 1, म्हसवड 5, दहिवडी 4, विरकरवाडी 1, शेवारी 1, खाटलवस्ती 1,
खंडाळ 10
शिरवळ 2, लोणंद 3, खंडाळा 4, अहिरे 1,
कोरेगाव 20
कोरेगाव 3, रहिमतपूर 4, एकसळ 1, कुमठे 2, वाठार किरोली 5, शिरंबे 2, निढळ 1, ल्हासुर्णे 1, अनपटवाडी 1.
पाटण 7
पाटण 1, पांढरवाडी 1, साइर्कडे 1, खाबळवाडी 1, गारवडे 1, मारुल हवेली 1, अबदारवाडी निझरे 1.
जावली 16
मेढा 2, गंजे 1, बेलवडे 1, खर्शी 1, ओझरे 5, शेटे 1, आगलावेवाडी 4, कुडाळ 1.
इतर पिंपरी 1
बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1
6 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये पसरणी ता. वाई येथील 35 वर्षीय महिला, वजरोशी ता. पाटण येथील 59 वर्षीय पुरुष, कुस बुद्रुक ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला तसेच विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये भुयाचीवाडी ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, चच्चेगाव ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, किर्पे ता. कराड येथील 60 वर्षीय पुरुष अशा 6 एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
घेतलेले एकूण नमुने.1,81,990
एकूण बाधित………..45,560
घरी सोडण्यात आलेले.39,692
मृत्यू……………………1,509
उपचारार्थ रुग्ण……….4,359