प्रतिनिधी / सातारा
दारू झाली गोड.जिलेबी झाली कडू.कोरोनाचा फिरे गडू.व्यावसायिकाना येतंय रडू.असाच प्रकार सातारा जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या बाबतीत घडू लागला आहे.स्वातंत्र्य दिनाला जिलेबी विक्री करायची नाही. असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढल्याचा निषेध म्हणून आणि ती बंदी उठवण्यात यावी या मागणीसाठी जिल्ह्यातील मिठाई विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना मिठाई देत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मिठाई वाटप करण्यात आले.
स्वातंत्र दिनाला मिठाई विक्री म्हणजे जिलेबी विकू नये असा फतवा जिल्हाधिकारी कार्यलयातून काढण्यात आला. त्यामुळे अगोदर कोरोनामुळे मिठाई विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे दिवाळे निघाले आहे. असे असताना कसे बसे या स्वातंत्र दिनाच्या दिवशी तरी आपला व्यवसाय होईल अशी आशा धरून कर्ज काढून कच्चा माल आणला गेला परंतु जिलेबी तयार करण्यासाठी पीठ मळले, साखर पाखात घातली अन् आदेश निघाला, त्यामुळे जिलेबी घाण्यात अडकल्याचा प्रकार झाला आहे. सोशल डिस्टनन्स ठेवून जिलेबी विक्रीस परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मिठाई वाटप करताना व्यवसायिक उपस्थित होते.
Previous Articleखासदार नवनीत राणा अस्वस्थच; पुढील उपचारासाठी मुंबईला!
Next Article सातारा : अतीतमध्ये दहा तर नागठाणेत पाच कोरोना बाधित









