सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट केले आहे. बंद घर दिसले तर चोरटे त्यावर डल्ला मारत असून, दोन दिवसांपूर्वी केसरकर पेठेतील बंद बंगला फोडून चोरट्यांनी 10 लाखांचे दागिने लंपास केले. तर शाहूपुरी चौकातील दोन बंद दुकानेही फोडून हजारो रुपयांचा माल लंपास केला असतानाच दि. 5 रोजी शाहूनगरमध्ये बंद घर फोडून चोरटयांनी 10 हजारांचा एलईडी टीव्ही चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
मयुरा सुनील महाजन (वय 46) या सध्या पुण्यात रहात आहेत. त्यांचा शाहूनगरमधील श्रीधर स्वामी सोसायटीतील बंगला बंदच असतो. दि. 5 व 6 सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराच्या लाकडी दरवाजाचे कुलूप, कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात मौल्यवान वस्तू नसल्याने त्यांनी 32 इंची एल. जी. कंपनीचा टीव्ही चोरुन नेला.