कार सेवकांना घरातच राम नवमीच्या दिवशी आला प्रत्यय
प्रतिनिधी / सातारा :
राम तो घर घर मे है… राम हर आंगण मे है…मनसे रावण जो निकले..राम उनके मनमे..या उक्तीचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील वडूज येथील कार सेवक अशोक गाढवे यांच्या घरी आज श्रीराम नवमीच्या दिवशीच आला. गाढवे यांच्या पत्नी रुक्मिणी गाढवे यांनी तव्यात भाजत टाकलेल्या चपातीवर श्रीरामाचे नाव उमटले. अन् त्यांनी स्वयंपाक करता करताच हात जोडले. सगळ्या कुटुंबीयांनाही प्रभू रामचंद्रांनीच दर्शन दिले, अशी भावना झाली.
मनात देव असेल तर चराचरात भरलेला देव दृष्टीस पडतो. परंतु जर दृष्टीच नसेल तर जवळ असूनही दिसत नसतो. श्रीरामाचे भक्त असलेले वडूजचे गाढवे कुटुंब. अयोध्येला कारसेवक म्हणून त्यावेळी गाढवे बंधू गेले होते. तेथून आल्यानंतर वडूज स्थानकावर त्यांचे स्वागत झाले होते. अशा त्याच्या कुटुंबियांच्या आठवणी उफाळून आल्या आज सकाळी कुटुंबियांचा स्वयंपाक करत असताना रुक्मिणी अशोक गाढवे या चपात्या लाटुन त्या तव्यात भाजत होत्या. चपाती भाजत असतानाच एका चपातीवर श्रीराम हे नाव उमटल्याचे त्यांचा मुलगा अमित याच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच हात जोडले. त्या चपातीवर श्रीरामाचे नाव पाहून सगळय़ा कुटुंबियांना मनापासून देव पावल्याचा आनंद झाला.









