पोलीस बँड पथकाने वाजविला देश भक्तीपर गाणी
प्रतिनिधी / सातारा
आजच्याच दिवशी 2 जानेवारी 1961 रोजी तदकालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यानी महाराष्ट्र पोलिसांना त्याचे स्वतंत्र ध्वज प्रदान केले होते ,तेव्हा पासून 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा होते, आज सातारा येथे शहरात ठिक – ठिकाणी पोलीस उन्नत दिनाचे फलक लागले असून त्या निमित्ताने 2 ते 8 जानेवारी या दरम्यान विविध कार्यक्रम होणार आहेत.
त्याचा एक भाग म्हणून आज मोती चौक सातारा येथे पोलीस बँड पथकाने कोविड जनजागृती फलक लावून देश भक्तीपर गीत वाजविली ,सारे जहाँ से आच्छा, आय मेरे वतन के लोगो या सु मधुर गीतांनी परिसरात देश भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली ,पुढील 7 दिवस कोरोना , वाहतूक नियम या विषयावर जनजागृतीचे कार्यक्रम होणार आहेत.









