प्रतिनिधी / सातारा
भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि १ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर, शेतकऱ्यांना दुधाला अनुदान मिळाले पाहिजे, शेतीपूरक व्यवसाय दूध पावडरला अनुदान मिळाले पाहिजे या साठी आंदोलन करण्यात आले.
मा.आ. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भारतीय जनता पार्टी नेहमीच शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभी आहे असे त्यांनी स्पष्ट केले . दि २१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना या बाबतचे निवेदन दिले होते, तसेच त्याची प्रत मा मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्री महोदयांना पाठवली आहे, आज पर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळावा या साठी या तीन चाकांच्या सरकारने कोणतेही काम केले नाही, शेतकऱ्यांचा खोटा कळवळा आणून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम हे सरकार करत आहे.
दुधाला अनुदान देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. या पुढेही अशीच परिस्थिती राहिली तर मा. विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी आणि प्रदेशाध्यक्ष मा आ चंद्रकांतदादा यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल,असा इशारा दिला आहे. या आंदोलनात मा.आ. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष आणि नगरसेवक व पदाधिकारी ,कार्यकर्ते,नागरिक, शेतकरी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








