सातारा/प्रतिनिधी
साताऱ्यामधील जुन्या एमआयडीसीतील दोन कंपन्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत या दोन कंपन्या भस्मसात झाल्या. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या आगीत अँटिक ट्रान्सपोर्ट अँड प्रा.लि. या कंपनी बरोबरच लगत असलेल्या कंपनीचेही सुमारे 20 लाखाच्या वर नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. या कंपन्यामध्ये तेलाचे डबे, मशिनरी आदी साहित्य जळाले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी सातारा पालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब, रहिमतपूर पालिका, कूपर कारखाना, अजिंक्यतारा कारखाना यांचे बंब ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.









