सातारा / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी शेखर सिंह जिल्हादंडाधिकारी, सातारा यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियत 2014 चे कलम (37)(1)(3) अन्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यात 14 ऑगस्ट रोजीच्या सायं 6 वाजल्यापासून ते 15 ऑगस्ट रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत या कालावधीत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी केले आहेत.
पोलीस अधिक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही.
Previous Articleसांगली : तासगावात कोरोनाने पुन्हा तिघांचा बळी
Next Article उस्मानाबाद जिल्ह्यात ११३ कोरोना रुग्णांची भर









