सातारा / प्रतिनिधी :
सातारा येथील जुना मोटार स्टँड परिसरातील सुमित्राराजे व्यापारी संकूलाच्या पार्किंगमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 535 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
याप्रकरणी पोलिसांनी संतोष शंकर वाघमारे (वय 52, एकता कॉलनी, करंजे, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला असून, त्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.









