प्रतिनिधी / सातारा :
गेली पंधरा दिवस सातारा शहर व परिसरामध्ये सुरू असलेल्या घरफोड्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. सततच्या घरफोड्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, साताऱ्यातील केसरकर पेठेतील बंद बंगला फोडून चोरट्यांनी तब्बल 20 तोळय़ांचे 10 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 10 हजार रुपये असा 10 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
1 ते 5 सप्टेंबरदरम्यान केसरकर पेठेत असलेल्या प्रभू कृपा हॉस्पिटल समोरील आशीर्वाद बंगला फोडून चोरटय़ांनी दहा लाख दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी शितल इम्तियाज नायकवडी (रा. धानोरी, पुणे) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.