प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ाला इतिहास कालीन असे अनेक पुरावे आहेत. अनेकदा विविध ठिकाणी उत्त्खनांन दरम्यान इतिहास कालीन पुरावे मिळाले आहेत. अशाच प्रकारचा इतिहासकालीन पुरावा मंगळवारी प्रभाग क्र. 6 मध्ये मिळाला आहे. येथील लोणार गल्ली जवळ रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना रस्त्याखाली ब्रिटिशांनी बांधलेले कमाणीचे गटार सापडले आहे.
याबबतची माहिती मिळताच जाणाऱया येणाऱया बघ्यांची एकच गर्दी याठिकाणी झाली होती. या बाबत अधिक माहिती अशी की, प्रभाग क्रमांक 6 रविवार पेठ येथे सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. मंगळवारी येथील वेणूताई डी. एड. कॉलेज जवळ रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना डांबरीकरणासाठी वापरली जाणारी मशीन त्या ठिकाणी काम करत असताना अचानक जमीन हादरू लागल्याने काम थांबवून मशीन बाजूला घेतली असता येथील रस्ता खचला आणि त्या खालील बाजुस जुन्या काळातील भुयारी कमानदार गटार यंत्रणा समोर आली.
या ठिकाणी ब्रिटिशांनी बांधलेले वीट बांधकाम असलेली गटार दिसून आली. आता संपूर्ण रस्ता खोदून त्या ठिकाणी मोठय़ा सिमेंट पाईप टाकण्यात येत आहेत. हे संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर वरील रस्त्याचे काम करण्यात येणार असल्याचे नगरपरिषद अधिकाऱयांनी सांगितले. काम होईपर्यंत सदरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याप्रसंगी संबंधीत कंत्राटदार अधिकाऱयांसमवेत नगरसेवक श्रीकांत आंबेकर व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
फोटो 4एसएटीए26
आमच्या प्रभागाला ऐतिहासिक वारसा
आमचा प्रभाग क्रमांक 6 मध्ये यापूर्वी ही खोदकाम करताना इतिहासकालीन संदर्भ असलेल्या काही वस्तू आढळून आल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटर काम करत असताना जुनी ऐतिहासिक बांधकाम असलेली देवळी आढळून आली होती. आता ही आमच्या लोणार गल्लीत ब्रिटिश कालीन गटरचे काम आढळून आल्याने इतिहास कालीन पाऊल खुणा अजून आहेत. आम्ही आमचे नेते बाबाराजे यांच्या नेतृत्वखाली अशा बाबींचे जतन करण्यासाठी प्रयत्न करू.
योगेश चोरगे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाग 6.









