व्यापाऱयांनी कोणत्याही पक्षाचा बंद पाळणार नाही असे केले आवाहन
प्रतिनिधी/ सातारा
सातारकरांनी अलिकडे बंदच्या घटना अनेकदा पाहिल्या आहेत. अचानकपणे होत असलेल्या बंदमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रासाला समोरे जावे लागत आहे. याचाच विचार करुन बहुजन क्रांती मोर्चाने दिलेल्या बंदच्या हाकेच्या आदल्या दिवशीच साताऱयातल्या व्यापाऱयांनी तसेच साताकरांनी बंद ला नको म्हणालया शिका असे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार सर्वच साताऱयातील व्यवहार सुरळीत ठेवत सातारकरांनी बंदचाच फुटबॉल केला.
गेल्या दोन वर्षापूर्वी दिवाळीत एसटी कर्मचाऱयांनी संप पुकारला होता. त्यावेळीही सातारकरांचे बेहाल झाले होते. भाजपाच्या काळातही एकदा बंद पुकारला होता. तर या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात एनआरसी व सीएएच्या मुद्यावरुन बंदचे लोण साताऱयातही आले. साताऱयातल्या व्यापाऱयांनी यापुर्वी छोटे मोटय़ा बंदमध्ये सहभाग घेतल्याच्या होत्या. तर साताऱयात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या बंदवेळी उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभाग नोंदवला होता. परंतु त्याच दिवशी जे सर्वसामान्य साताकरांचें बेहाल झाले ते साताकरांनी सोशल मीडियावर व्यक्त करुन बंदला नाही म्हणायला शिका असे आवाहन करण्यात आले. त्याच मुळे बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने भारत बंदची बुधवारी हाक दिली होती. बुधवारी बंद च्या अगोदरच मंगळवारी साताऱयातल्या व्यापाऱयांनी बैठक घेवून कोणत्याही पक्षाचा आम्ही बंद पाळणार नाही, असे आवाहन करत सर्वच व्यापाऱयांनी आपले व्यवहार सुरु ठेवले. दरम्यान, बंदचे आवाहन करणारे बहुजन क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शहरातून आपल्या कारमधून मोबाईलवर शहराची चित्रीकरण करत होते. अमोल बनसोडे नामक पदाधिकारी हे कार चालवत होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसत होता. यामुळे साताऱयातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते.









