शहर पोलिसांची कारवाई- नियम पाळा अन्यथा कारवाई होणारच
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर व परिसरात गेल्या पोलिसांच्या कारवायामुळे रस्त्यावरील वर्दळ थंडावली असली तरी काहीजण दुचाकी घेवून रस्त्यावर येतच आहेत तर दुकानदारांना घरपोच सेवेसाठी परवानगी असताना काही दुकानदार दुकान उघडे ठेवत असल्याने अशा दहा जणांवर कारवाई करत त्यांच्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, लॉकडाऊनचे नियम पाळा अन्यथा कारवाई होणारच, असा इशारा पोलीस दलाने दिलेला आहे.
यामध्ये कमानी हौद परिसरात विनाकारण दुचाकी घेवून फिरणाऱया महमंद बबलू कुरेशी (वय 24, रा. माने कॉलनी, एमआयडीसी, सातारा), अभिजित जनार्दन कुलकर्णी (वय 42, रा. मंगळवार पेठ, सातारा), शुभम संजय बेंद्रे (वय 24, रा. आरटीओ ऑफिसच्या पाठीमागे, सातारा), शफीक मोहम्मद शेख (वय 39, रा. करंजे पेठ, सातारा), अनिल अरविंद हजारे (वय 22, रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा),प्रशांत अंतू पवार (वय 35, रा. कातकर वस्ती, लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा), विनोद यशवंत करंदकर (वय 39, रा. शाहूनगर, सातारा), अर्चना प्रकाश कदम (वय 28, रा. आदर्शनगर, सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
सातारा शहर पोलीस ठाण्याच्या समोर असणारे अजिंक्य टायर्स ही आस्थापना चालू ठेवल्याप्रकरणी अखिल शाहीकर शेख (वय 30, रा. रविवार पेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा येथील संगमनगर कालवा परिसरात असणारे ओम मटण अँड चिकन शॉप उघडे ठेवल्याप्रकरणी महेश अरविंद निकोडे (वय 44, रा. देगाव राड, कोडोली, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.







