प्रतिनिधी/ सातारा
सोशल मीडियावरुन तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून सीएए कायद्याला विरोध म्हणून बंदचे आवाहन केले होते. साताऱयात या बंदला प्रतिसाद मिळाला. साताऱयात व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेवून आनंद लुटला. सर्वसामान्य साताकरांची या बंदमुळे चांगलीच गैरसोय झाली. काही ठिकाणी दुकाने, हॉटेल्स सुरु असल्याने तेवढाच आधार मिळाला.या बंदमध्ये कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
सीएए, एनआरसी या कायद्याला विरोध म्हणून वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सोशल मीडिया आणि मीडियातूनही हे आवाहन प्रसिद्ध झाल्याने सातारा शहरातील व्यापाऱयांनी स्वयंस्फुर्तीने बंद पाळला. बंद म्हणून सुट्टीचा एन्जाय आपल्या कुटुंबासमवेत काढत आनंद लुटला. काही व्यापारी तर चक्क कास पठार, ठोसेघर या भागात फिरायला गेल्याचे दिसत होते. तर व्यापाऱयांनी बंद ठेवल्यामुळे शहरातील अनेक नागरिकांची गैरसोय झाली. काही दुकाने सुरु होती. या बंद काळात कुठेही तोडफोड झाली नाही. वंचित बहुचन आघाडीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनीही शहरातून रॅलीही काढली नाही. परंतु त्यांनी ठेवलेल्या बंदमुळे ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे बेहाल झाले.









