प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील नटराज मंदिर परिसरात एका युवकाला बोलावून घेवून भांडणे मिटवण्यासाठी त्याला ल्हासुर्णे येथे जावू असे सांगत गाडीवरुन त्याच्या मित्रासह त्याला ल्हासुर्णे येथे घेवून ल्हासुर्णे फाटय़ावर नेले. तिथून मंगळापूर शाळेसमोर नेवून त्याला कोयता व दगडाने मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी साताऱयातील नऊ युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
टॉम जगताप, राज जाधव, अनिकेत जाधव यांच्यासह अनोळखी सातजणांवर (सर्व रा. सातारा) गुन्हा दाखल झालेला असून अद्याप कोणास अटक झालेली नाही. याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदार युवक सागर दिनकर पवार (वय 26 रा. विकासनगर, सातारा) हा हॉटेल व्यवसायिक आहे. पवार व टॉम जगताप, राज जाधव व अनिकेत जाधव यांच्यात हॉटेलमध्ये वाद झाला होता. दि. 28 रोजी दुपारी या तिघांनी पवारला नटराज मंदिर परिसरात बोलावून घेतले.
त्यावेळी पवार व त्याचा मित्र तिथे आले. त्यावेळी या तिघांनी त्यांना भांडणे मिटवण्यासाठी ल्हासुर्णे, ता. कोरेगाव येथे जावू असे सांगितले. पवार व त्याचा मित्र ल्हासुर्णे फाटा येथे त्यांच्यासमवेत गेले असता ल्हासुर्णे फाटा येथून मंगळापूर येथील शाळेसमोर गेल्यानंतर या तिघांसह अनोळखी चार ते पाचजणांनी जमाव जमवून तू आम्हाला तुझ्या हॉटेलमध्ये सँडविच खायला का दिले नाहीस असे म्हणत पवार व त्याच्या मित्राला शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी कोयत्याच्या उलटय़ा बाजुने व दगडाचाही वापर केल्याने पवार व त्याचा मित्र जखमी झाले आहेत.
याबाबत तक्रारीनंतर पोलिसांनी तिघांसह चार ते पाच अनोळखी अशा 9 जणांवर गुन्हा दाखल केलेला असून या गुन्हय़ाचा अधिक तपास पोलीस नाईक भोसले करत आहेत.








