जिल्ह्यातील बँड व्यावसायिकांनी बँड वाजून आपल्या मागण्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
प्रतिनिधी / सातारा
राज्यात कोरोनाचे प्रादुर्भाव झाले आणि 22 मार्चपासून आज अखेर परिस्थिती बिकट होत चालली आहे, मार्च ते जुलै या काळात बँड व बेंजो व्यावसायिकांनी ज्या सुपाऱ्या घेतल्या होत्या त्या रद्द झाल्या, ऍडव्हान्स पैसे ही परत करावे लागले, आज 7 महिने झाले आमचा व्यवसाय ठप्प आहे.
या व्यवसायावर अवलंबून असणार्या अनेक कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही जगायचे कसे, आम्हाला आमचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी आणि शासन नियमाप्रमाणे डिस्टन्स पळून व्यवसाय करू पण आम्हाला परवानगी द्यावी अशी मागणी सातारा जिल्हा बँड वादक असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदना द्वारे करण्यात आली. तदपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॅंड वाजवून हे आंदोलन करण्यात आले.