प्रतिनिधी/सातारा
सातारा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. दिवसागणित मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने सातारकरांची चिंता वाढली आहे. काल, रविवारीच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेवून सूचना केल्या आहेत.
दरम्यान, काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 115 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये पाटण, कराड, सातारा, खटाव, कोरेगाव, वाई, माण, खंडाळा, जावली फलटण तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. तर, कोल्हापूर शिवाजी पेठ येथील 42 वर्षीय पुरुष, अहमदनगर येथील 31 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
4 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे माळी आळी, लोणंद ता. खंडाळा येथील 60 वर्षीय महिला, अतित ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष तसेच कोळकी, फलटण येथील 75 वर्षीय महिला मृत्यु झाला आहे, असे डॉ. गडीकर यांनी कळविले आहे. सातारा येथील खासगी हॉस्पीटमध्ये पांढरवाडी (जाधववाडी) ता. माण येथील 72 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचे खासगी हॉस्पीटल कडून कळविण्यात आले आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने 32463
एकूण बाधित 5765
घरी सोडण्यात आलेले 2677
मृत्यू 178
उपचारार्थ रुग्ण 2910








