सातारा : नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटन स्थळावर पर्यटक येतात. कोविडच्या अनुषंगाने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्बंध घालण्यासाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी 31 डिसेंबर रोजीच्या सर्व कार्यक्रमांना रात्री 10 वाजल्यानंतर चालू ठेवण्यास सक्त मनाईचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधिताविरुध्द दंडात्मक तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Previous Articleराष्ट्रवादीच्या नगरसेविका स्वाती पारधी यांचा राजीनामा
Next Article युवा पत्रकार अमृत मंडलिक यांची आत्महत्या









