विश्वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी यांची माहिती
वार्ताहर/औंध
‘शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान ‘ या संस्थेतर्फे औंध जिल्हा सातारा येथे आयोजित केला जाणारा ‘औंध संगीत महोत्सव’ यंदा ५ नोव्हेंबर २०२० रोजी येत आहे. हा महोत्सव यंदा ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाच्या अधिन राहून संसर्गाचा धोका लक्षात घेऊन संस्थेने यावर्षी उत्सवाचे स्वरूप बदलून ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. २२ नोव्हेंबर रोजी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या युट्यूब तसेच फेसबुक पेज वरून कलाकारांच्या सादरीकरणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. कलाकारांची नावे संस्थेतर्फे लवकरच कळवण्यात येतील. पाच नोव्हेंबर रोजी औंधला श्रोत्यांनी उपस्थित राहू नये असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अश्विन वद्य पंचमीला दरवर्षी औंधला शास्त्रीय संगीत महोत्सव साजरा केला जातो. ग्रामीण भागात गेली ऐंशी वर्षे हा महोत्सव अविरतपणे सुरू आहे. ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक पं. अंतुबुवा जोशी यांनी त्यांचे अध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९४० पासून हा महोत्सव सुरू केला आहे. छोटेखानी उत्सवाचे स्वरूप हळूहळू वाढत गेले. आणि पं. अंतुबुवांचे सुपुत्र, प्रख्यात गायक व व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी यांनी १९८१ साली ‘शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करून महोत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
मुळपीठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या औंध कलामंदीरात या महोत्सवातील दिग्गज कलाकारांची जुगलबंदी रंगते. ग्रामीण भागातील अनेक श्रोत्यांना या संगीत महोत्सवाची ओढ लागते. कोरोनाच्या महामारीमुळे महोत्सवाला श्रोत्यांची गर्दी झाल्यास संसर्गाचा प्रादुर्भाव होईल हा धोका ध्यानात घेऊन यंदा रसिकांच्या उपस्थितीत ‘औंध संगीत महोत्सव ‘ साजरा करणे शक्य होत नाहीये. गायन वादनाच्या प्रत्यक्ष अनुभवाला श्रोते मुकणार आहेत या बद्दल संस्थेचे सचिव पं. अरुण कशाळकर व सहसचिव सौ. अपूर्वा गोखले यांनी खंत व्यक्त केली. परंतु पुढील वर्षी तो आनंद नक्कीच रसिकांना घेता येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









