प्रतिनिधी / सातारा
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत ५१३ नागरिकांना घरी सोडण्यात आले असून १८१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
१८१ जणांचे नमुने पाठविले तपासणीला
फलटण येथे ५२, खंडाळा येथे ५८, रायगाव येथे ४९, पानमळेवाडी १७, महाबळेश्वर ५ असे एकूण १८१ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने १,२४,८०१
एकूण बाधित ३५,४०१
घरी सोडण्यात आलेले २५,५१४
मृत्यू १,०७९
उपचारार्थ रुग्ण ८,८०८









