प्रतिनिधी / पाचगणी
वेळोवेळी नगरपालिकेला हॉटेल नमस्ते पुरोहितच्या समोर असलेल्या नगरपालिकेच्या जागेबाबत चाललेल्या अतिक्रमान संदर्भात तक्रारी देऊन सुद्धा पाचगणी नगरपालिकेचे सिईओ दापेकर यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केल्यामुळे आणि संबंधित अनधिकृत बांधकाम व शेड उभ करणाऱ्या नमस्ते पुरोहितला पाठीशी घातल आहे. यामध्ये मोठी आर्थिक सेटलमेंट झाली असल्याची चर्चा सध्या पाचगणीत रंगू लागले आहे या कारणामुळे येत्या 24 रोजी पाचगणी नगर परिषदेच्या गेट समोर कोरोणाचा संकटात आंदोलन करण्याचे हे पाऊल उचलावे लागत असून हे आंदोलन बेमुदत करत असताना या आंदोलना मध्ये जर का कोणी दिशाभूल करण्याचे काम केलं किंवा हे आंदोलन दडपण्याचा कोणी काम केलं तर यापुढे आंदोलन हे यापेक्षाही भयंकर वादळासारखा असेल असा इशाराच थेट सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे यांनी दिला.
असून येणाऱ्या काळात बेकायदेशीर हटाव नगरपरिषद मिळकत बचाव असा नाराच सर्व सामान्य लोक देत असून येणाऱ्या काळामध्ये मुख्याधिकारी होश मे आव असा इशाराच अनमोल कांबळे यांनी दिला आहे. ठराव व भाडेपट्टा करार संपल्यानंतर ही नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करत असलेल्या व्यक्तींना पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणीही सर्व सामान्य जणतेकडून व सामाजिक कार्यकर्ते अनमोल कांबळे यांनी केला आहे संबंधित आंदोलनाचे निवेदन नगरपालिकेचे co चापेकर साहेब यांना देण्यात आले असून पोलीस स्टेशनला ही याची एक प्रत दिली असल्याची माहिती अनमोल कांबळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









