प्रतिनिधी/नागठाणे
सातारा जिल्हा हार्वेस्टिंग मशीन संघटनेच्या अध्यक्षपदी बोरगाव (ता.सातारा) येथील संजय साळुंखे यांची नुकतीच निवड करण्यात आली. बोरगाव येथील कृषी पर्यटन केंद्रात सातारा जिल्ह्यामधील हार्वेस्टिंग मशीन मालकांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ही निवड करण्यात आली.
या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये ऊस तोड हंगामात ऊस तोडणी दर,सबसिडी, ऊस तोडणी पेमेंट व कमिशन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी साखर कारखाना व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना पातळीवर प्रयत्न केले जातील असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी झालेल्या बैठकीत कार्यकारिणी निवड करण्यात आली. यामध्ये संजय बाळकृष्ण साळुंखे याची अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी अमोलराज वसंत जाधव, सचिव पदी अभिजीत सुनील माने यांची तर संचालक म्हणून अविनाश मोहनराव सावंत, भुषण राजाराम पाटील, दत्तात्रय प्रल्हाद पवार, राहुल अंकुश भोसले, अशोक तुकाराम बाबर, वैभव कोंडीराम सावंत, रणजित निकम,विजय घोडके यांची निवड करण्यात आली. यावेळी कारखान्यांकडून हार्वेस्टर मशीनचे ऊस तोडणी दर निश्चित झाल्याशिवाय मशीन चालू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









