रूग्णास गंभीर इजा झाल्यास जबाबदार कोण ?
प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वॅब संकलनाचे काम गावोगावी सुरू आहे. हे नमुने अप्रशिक्षित कर्मचारी घेत असल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. जिह्यातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱयांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या पाच महिन्यापासून त्यांचे हे काम सुरूच आहे. मात्र ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचना पायदळी तुडवून हे काम करून घेतले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेने केला आहे.
‘आयसीएमआर’ च्या मार्गदर्शक सुचनानुसार रॅपीड व अँटीजेन टेस्ट व स्वॅब चाचणीचे नमुने घेण्याचे काम एमबीबीएस डॉक्टर अथवा ईनटी तज्ञाचे आहे. तरी देखील जिह्यातील सर्व प्रयोगशाळा अधिकारी हे काम करत आहेत. यातील 90 टक्के अधिकाऱयांची याबाबत शैक्षणिक पात्रता नाही व त्यांना प्रशिक्षणही दिलेले नाही. स्वॅब संकलनामुळे कोरोना रूग्णांच्या संपर्कात सर्वात अगोदर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी येत आहेत. त्यामुळे या अधिकाऱयांना संसर्गाचा धोका अधिक संभवतो. जिह्यात हिवताप विभागातील 40 पैकी 7, क्षयरोग विभागातील 13 पैकी 2 तर जिल्हा रूग्णालयात एचआयव्ही विभागातील 13 पैकी 3 अधिकाऱयांना कोरोनाची लागन झाली आहे. काही अधिकाऱयांचे कुटुंबिय देखील कोरोनाबाधित असून, काही जणांवर रूग्णालयात तर काहीवर घरात उपचार सुरू आहेत.
कोरोना रूग्णांचे तातडीने निदान करण्यासाठी स्वॅब चाचणी परिणामकारक ठरत आहे. परंतु ती नेमकी कशी घ्यावी, चाचणीसाठी वापरली जाणारी सामुग्री कशी हाताळावी, घशातील व नाकातून स्वॅब घेताना स्टीक किती अंतरापर्यंत जायला हवी, याचे पुरेपूर प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. मात्र प्रशासकीय अधिकाऱयांनी असे कोणतेही प्रशिक्षण प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱयांना दिले नाही. त्यामुळे स्वॅब घेताना जर एखाद्या रूग्णाला गंभीर इजा तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









