सातारा / प्रतिनिधी :
सातारा विकास आघाडीच्या स्वीकृत नगरसेवकपदी बाळासाहेब ढेकणे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभेद्वारे ही निवड करण्यात आली. बाळासाहेब ढेकणे यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार उदयनराजे यांनी पालिकेच्या गेटवर भेट देऊन त्यांना हटके शुभेच्छा दिल्या.
अतिउत्साही कार्यकर्त्यांनी एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज अशा घोषणा देत फटाके फोडले. निवडीवेळी सभापती ज्ञानेश्वर फरांदे, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, नगरसेवक विजय काटवटे, राम हादगे, संजय पाटील, अमित कुलकर्णी,गणेश आरडे आदी उपस्थित होते.









