प्रतिनिधी / सातारा
गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेल्या कोरोनाविरुध्दच्या लढाईत गेले दोन महिने जिल्हावासियांनी कठोर परीक्षाच दिली. बाधितांची संख्या मोठया प्रमाणात वाढल्याने वातावरण पॅनिक झाले होते. मात्र, ऑक्टोबरच्या आरंभापासून बाधितांची संख्या मंदावू लागली अन ऑक्टोबरच्या महिनाअखेरीस सातारा शहर व तालुका सोडल्यास सर्वच तालुक्यात मोठ्या संख्येने येणारी बाधितांची संख्या घटल्याचा दिलासादायक अनुभव दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वांना आल्याने माणसं सुटकेचा निश्वास टाकू लागलीत.
बळींच्या संख्या दीड हजार पार
कोरोना संसर्ग वाढल्यानंतर केवळ दोन महिन्यात बाधितांची संख्या मोठया प्रमाणात वाढली अन मृत्यूदर देखील वाढत गेला. गेल्या आठवड्यापासुन तो कमी येवू लागला असला तरी आजपर्यंत एकूण 1,503 जणांचा कोरोना बळी गेला आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न आहे. सध्या उपचारार्थ फक्त 4,713 रुग्ण असले तरी त्यापैकी 75 टक्के रुग्ण होम आयसोलेटेड असून आरोग्य विभाग त्यांच्या संपर्कात आहे.
सातारा शहर, तालुक्याला सावरण्याची गरज
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बाधित वाढीचा वेग कमी होवू लागलाय. रविवारी रात्रीच्या अहवालात पाच तालुक्यात दोन आकडी संख्येने बाधित समोर आलेत. यामध्ये फक्त सातारा तालुक्यात 42 एवढी मोठी संख्या आहे. कराडमध्ये केवळ 13 नवीन बाधित समोर आले असून तीच परिस्थिती जावली, खटाव तालुक्यात आहे. खंडाळ्यात नवीन रुग्ण समोर आले नाही तर महाबळेश्वर, माण, कोरेगाव, वाईत एक अंकी संख्येने रुग्ण वाढले असले तरी गंभीर स्थितीत कोणीही नाही.
13 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित पुढील :
सातारा 42
सातारा 13, मंगळावार पेठ 5, शनिवार पेठ 1, करंजे पेठ 3, केसरकर पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, गोडोली 1, पिरवाडी 1, गोडोली 1, बोरखळ 1, मत्यापूर 1, खेड 2, तामजाईनगर 1, वळसे 1, गुजरवाडी 1, वाघोशी 1, लिंब 3, चिंचणेर 1, विकासनगर 1, चिंचणेरवंदन 2.
फलटण 14
गोळीबार मैदान 2, दलवाडी 3, तरडगांव 1, गिरवी 5, तडवळे 1, ढवळेवाडी 2.
जावली 13
केडांबे 1, आंबेघर 1, केळघर 1, कुसुंबी 1, मेढा 1, सांगवी 1, आगलावेवाडी 7.
खटाव 13
खटाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, पुसेगांव 3, वर्धनगड 5, निढळ 1, गारवडी 1, वर्धनगड 1.
कराड 13
कराड 1, उंब्रज 1, मलकापूर 3, तुळसण 1, शेरे 4, वाठार 3.
वाई 3
सह्याद्रीनगर 1, सुरुर 1, चिंधवली 1.
महाबळेश्वर 2
गोडवली 2.
माण 3
दिवड 1, माळवाडी 1, बिदाल 1.
कोरेगाव 4
कोरेगांव 1, ल्हासुर्णे 1, रहिमतपूर 1, सोनके 1,
इतर : आर्ले 1, खोळेवाडी 1.
बाहेरील जिह्यातील ठाणे 1, शेडगेवाडी (सांगली) 1,
जिल्हय़ात 6 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये येळगाव ता. कराड 65 वर्षीय महिला. जिल्हा कोविड रुग्णालय सातारा येथे ढोकळवाडी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ सातारा 72 वर्षीय महिला, खटाव 63 वर्षीय पुरुष, रहितमपूर ता. कोरेगाव 76 वर्षीय महिला, तसेच जिह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कुडाळ ता. जावली 70 वर्षीय पुरुष अशा 6 एकूण बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 1,80,568
एकूण बाधित 45,373
एकूण कोरोनामुक्त 39,157
मृत्यू 1,503
उपचारार्थ रुग्ण 4,713