प्रतिनिधी / महाबळेश्वर
सोंडपार गावातील रामवरदायनी मंदिरा जवळील पाण्याच्या कुंडामध्ये ( विहिरीमध्ये) रानगवा (इंडियन गौर) पडला असल्याची माहिती वनविभागास कळाल्याने वनविभागाचे कर्मचारी यांनी तेथे प्रत्यक्ष पाहणी करून पाहिले असता रानगवा पाण्यात असल्याचे दिसून आले व त्याला पाण्यातून बाहेर येता येत नसल्याचे दिसून आले त्यादृष्टीने त्याला कुंडातून बाहेर काढण्याची उपाय योजना म्हणून सदर पाण्याच्या कुंडामध्ये एका बाजूस दगड-गोटे टाकून गव्यास बाहेर येण्यास मार्ग करून दिला तसा तो रानगवा कुंडातून सुखरूप बाहेर आला व जवळील वनक्षेत्रामध्ये नैसर्गिक अधिवासात निघून गेला.
सहा. वनसंरक्षक (वनीकरण) सातारा विजय गोसावी व वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांचे मार्गदर्शनाखाली कुंभरोशी वनपाल एस. व्ही. गुरव व वनरक्षक,आकाश कुंभार,वनरक्षक प्र. पार्क. रोहित लोहार,वनरक्षक दीपक सोरट,आशिष पाटील, विश्वंभर माळझरकर, कुमार खराडे, बजरंग वडकर तसेच सह्याद्री प्रोटेक्टर् चे सदस्य संदेश भिसे ,अजित जाधव, प्रथमेश यादव पोलीस पाटील नितीन सोंडकर व सोंडपार व प्रतापगड ग्रामस्थ यांनी बचावकार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली यावेळी वनविभागामार्फत कोणताही वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास नजीकच्या वनविभाग कार्यालयास कळवावे असे आवाहन करण्यात आले.