सातारा / प्रतिनिधी:
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सर्रास एकरी ४० हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी आपत्ती येऊच नये म्हणून कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्रामध्ये आलेल्या अवकाळी व नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वच पिकांचे हातातोंडाशी आलेले उत्पादन हे पाण्यात भिजून गेले आहे. त्यामुळे वर्षभराचे शेतातील कष्ट वाया जाऊन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा होऊन, ते पूर्णपणे खचून गेले आहेत.त्याच बरोबर घरांचे सुद्द्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने कोणत्याही कागदपत्रांची यादी न मागता आता ताबडतोब खावटी अनुदान द्यावे. यासाठी लवकरात लवकर हानी पोचलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन सरसकट एकरी आणि घरापाठीमागे ४० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. कधी दुष्काळ, कधी पूर तर कधी अवकाळी पाऊस अशी संकटे काही वर्षानी पुन्हा पुन्हा येऊन सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटीचा भार पडत आहे. यासाठी कायम स्वरूपी उपाय योजना करणे अत्यावश्यक आहे. यासाठी समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबऊन सर्व गावातील सर्व कुटुंबाना जीविकेला आवश्यक शेतीचे पाणी द्यावे म्हणजे तेवढ्या प्रमाणात पाणी तिकडे वळवता येईल. आणि नदी, नाले, ओढे यांचे काठावर झालेली अतिक्रमणे तातडीने काढणे, त्याचबरोबर सर्व नैसर्गिक प्रवाह होते तेवढया खोलीचे व रुंदीचे करणे. हे कार्य आणीबाणीच्या पातळीवर केले पाहिजे. शहरामध्ये सुद्धा या पद्धतीनेच कोणाही हितसंबंधितांचा विरोध न जुमानता हे कार्य आणीबाणीच्या पातळीवर केले पाहिजे असे आम्हाला वाटते. याचबरोबर समुद्र सपाटीजवळच्या खारेपाट क्षेत्रात समुद्राचे पाणी आत येऊन निचरा होणेसाठी असलेले बंधारे व उघड्या ह्या मोडल्यामुळे आणि अतिवृष्टी मुळे शेतात पाणी येऊन नुकसान होते, याच्या नुकसान भरपाई विषयी सुद्धा वेगळा विचार करावा लागेल. या उपायांची काटेकोरपणे अमलबजावणी केली तर अशा संकटावर मात करणे सहज शक्य आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. आपण याची गंभीर नोंद घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्याल आणि भरपाई द्याल अशी खात्री वाटते.सर्वांना मान्य होणाऱ्या या शास्त्रीय उपाययोजना राबवण्यासाठी जनतेला लढा करावा लागू नये अशी आमची अपेक्षा आहे,असे त्यांनी म्हटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









