प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्यातील नेले – किडगावपासून कळंबे या गावातून मेढा येथे जाण्यासाठी असलेला रस्ता गेल्या दीड वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. या रस्त्याला खड्डेच खड्डे पडले असून असलेले पूल ही धोकादायक बनले आहेत. पुलाचे काम कधी होणार, रस्त्याचे खड्डे कधी बुजवले जाणार असे अनेक प्रश्न नागरिकांच्यावतीने अभियंत्यांना जाग्यावर पाहणी करून सभापती सरिता इंदलकर यांनी जाब विचारत फैलावर घेतले. लोकांच्या जाण्यायेण्याचा हा रस्ता बंद होऊ शकतो. काम चांगले समन्वयातून करा, असे त्यांनी सुनावले.
सभापती सरिता इंदलकर यांनी कळंबे ते माळ्याचीवाडी या रस्त्याची व पुलाची पाहणी अभियंत्यांना घेऊन करण्यात आली. यावेळी शाखा अभियंता एस.व्ही.शिंदे,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक मोहन जाधव, सरपंच मंगल इंदलकर, उपसरपंच धनंजय इंदलकर, पोलीस पाटील विष्णू लोहार, माजी सरपंच प्रकाश चिंचकर, माजी उपसरपंच जगन्नाथ लावंघरे, अनिल जायकर, उदय लावंघरे, विनोद इंदलकर, ओंकार गुरव, अतुल लावंघरे आदी उपस्थित होते.
गत दीड वर्षांपूर्वी कळंबे ते माळ्याच्यावाडीचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात आला. सुमारे पावणे चार कोट रुपये खर्च करून हे काम करण्यात आले. यापूर्वी अनेकदा नागरिकांनी रस्ता दुरुस्त करण्यात यावा, तसेच पूल हा कॅनॉल झाला त्यावेळी केलेला असून एक पूल पडला आहे. तर एक धोकादायक बनला आहे.पूलावरुन जड वाहने नेली जात नाहीत.किती दिवस नागरिक आपला जीव मुठीत धरून बसतीलं.काम होणं गरजेच आहे, असे त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









