प्रतिनिधी / ढेबेवाडी
बनपुरी ता पाटण येथे क्वारंटाईन शिक्का असलेल्या महिलेचा अचनानक मुत्यू झाला. दोन दिवसापुर्वी ती महिला मुंबई येथून आली होती. गावातील शाळेत तिला क्वांरटाईन करण्यात आले होते. काल तिला अचानक त्रास सुरू झाल्याने तिला कराडला हलवण्यात येत होते. वाटेतच तिचा मुत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अजून समजले नसून ती व्यक्ती क्वारंटाईन असल्याने तिच्या असुन घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान कोरोनाने विभागात शिरकाव केला की काय या, भीतीने विभागात एकच खळबळ उडाली आहे. ढेबेवाडी, तळमावले बाजापेठ बंद ठेवण्यात आली आहे.
भागातील बनपुरी येथे शनिवारी १६ रोजी मुंबई येथून प्रवासी आलेल्या अंदाजे 43 वर्षीय महिलेला सणबुर शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. रविवारी दिनांक १७ रोजी तिला अचानक त्रास जाणवू लागल्याने कराडला हलवण्यात आले. दरम्यान तिचा वाटेतच मृत्यू झाला. यानंतर तिला गावात आणण्यात आले. मात्र कारण समजले नसल्याने सरपंच शिवाजी पवार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना संपर्क केला. सर्व हकीकत सांगितली. यानंतर तिला कराड उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंचांनी दिली. तिच्या मृत्यूचे खरे कारण समजले नसले तरी या घटनेमुळे ढेबेवाडी विभागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ढेबेवाडी तळमावले बाजारपेठ पुर्ण बंद ठेवण्यात आली आहे.
भागात मुंबईवरुन येणाऱ्या लोकांचे प्रमाण अतिशय वाढले आहे आता खरी कसोटी असून प्रत्येकाने खबरदारी घेऊन जबाबदारीने वागले पाहिजे. विभागात एकही संशयित सापडला नसल्याने प्रशासनाने बाजारपेठ काही नियम अटीवर सुरू केली होती. मात्र या घटनेमुळे व मुंबईवरून येणाऱ्या लोकांमुळे पुन्हा काही दिवस बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.
दरम्यान तहसीलदार अमारदिप वाकडे यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना या महिलेचा मृत्यू बाबत कळवले. त्यानंतर कराड येथे नगरपालिकेने तयार केलेल्या कोविड स्मशानभूमीत या महिलेवर सोमवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालिकेच्या आरोग्य विभागाचे रफिक भालदार, मिलिंद शिंदे उपस्थित होते.








