वार्ताहर / परळी
सज्जनगड परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. गडाच्या पाठीमागील बाजूस आंबाले तळे डोंगरावर रविवार पासून काही युवकांना बिबट्या दिसत आहे. गडावरील काही युवकांनी दगडावर बसलेल्या बिबट्याचे फोटो काढले. तसेच गडावरील एकाची शेळी खाल्ल्याचेही समोर आले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
या परिसरात यादववाडी, वाघवाडी, लोहारवाडी या गावातील बहुतांश गुरे ही याच भागात आसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गडावर भरती पूर्व प्रशिक्षणासाठी, सरावासाठी भल्या पहाटे व सायंकाळी शेकडो युवक येत असतात. त्यामुळे वनविभागाने बिबट्याचा योग्य तो बंदोबस्त करावा,अशी मागणी होत आहे.
Previous Articleसांगली जिल्ह्यात आज विक्रमी 1074 जण कोरोनामुक्त, 690 नवे रूग्ण
Next Article कोल्हापूर शहर, करवीरमध्ये मृत्यूदर सर्वाधिक!









