प्रतिनिधी / सातारा
येथील मंगळवार पेठेत राहणारे मजूर जोडपे कामानिमित्त करंजे येथे गेले होते. दुपारी कामावरून परत जात असताना एका भामट्याने पोलीस असल्याचे सांगून दंड भरा म्हणून पाचशे रुपये उकळून निघून गेला. त्या तोतया पोलिसांस शाहूपुरी पोलिसांनी काही वेळातच जेरबंद केल्याची घटना सातारा शहरात करंजे नाका येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहाजी राम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा शहर परिसरातच मिळेल त्या ठिकाणी ते पतीपत्नी दोघे मजुरीची काम करतात. त्यांची पत्नी सुरेखा व ते दोघे गेले दोन ते तीन दिवसापासुन करंजे येथील कुलकर्णी (रा . श्रीकृष्ण कॉलनी) येथे कामावर जातात. दि .19रोजी नेहमीप्रमाणे ते दोघे सकाळी 09.00 वा चे सुमारास पायी चालत श्रीकृष्ण कॉलनी करंजे सातारा येथे कुलकर्णी यांचेकडे कामाकरीता गेले. तेथील ब्रेकरचे मशीन बंद पडलेने ते दोघे दुपारी 1.30 वा चे सुमारास सुट्टी करून परत घरी जाणेकरीता पायी चालत निघाले. त्या दोघांना करंजे नाका रिक्षा स्टॉपजवळ एका माणसाने अडवले. त्याच्या अंगात पिवळया रंगाचा पाठीमागे मुंबई पोलीस असे इंग्रजीत लिहीलेले असलेला रेनकोट घातलेला होता.त्याने त्या दोघांना थांबवून पोलीस असल्याचे सांगत, कामावर जाण्याचा पास दाखव , आधारकार्ड दाखवणेस सांगत दम देत दंड भरावा लागेल असे सांगितले.
त्याने पाचशेची नोट घेऊन पावती न देताच तिथुन झेंडा चौक करंजे पेठ दिशेने पायी चालत निघुन गेला. त्यानंतर ते दोघे बराचवेळ तेथेच पावतीसाठी त्याची वाट पहात थांबले त्यावेळी तेथे मोटारसायकलवरुन जात असणारे दोन पोलीस त्यांना दिसले. त्यांना थांबविले व झालेला प्रकार त्यांना सांगितला व तो भामटा झेंडा चौक करंजे पेठचे दिशेने पायी चालत गेला असलेबाबत सांगितले. त्यावर मोटारसायकलवरील दोन्ही पोलीसांनी त्या भामट्याचा शोध घेवुन त्यास पकडुन त्यांच्यासमोर आणले. त्यास ओळखले. त्याचे नांव संतोष तुकाराम मोरे (वय -29 वर्षे , रा.करंजेनाका) असून त्यास ताब्यात घेवुन शाहुपूरी पोलीस स्टेशन सातारा येथे आणले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Articleमोटरसायकल अपघातात माद्याळचा तरुण ठार
Next Article शिरोळमधुन एक विवाहिता वय १९ वर्षाच्या तरुणी बेपत्ता








