शाळा, कॉलेजमधून जोरदार प्रतिसाद
प्रतिनिधी/ सातारा
स्वच्छ सर्व्हेक्षण 2020 च्या फीडबॅक मोहिमेत सातायातील नागरिकांनी पालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला.31 जानेवारीपर्यंत मुदत होती.शाळा, कॉलेज आणि सातारा शहरातींल नागरिकांनी आपली मते फीड बॅंकवर नौद केली.सातारा पालिका प्रशासनाने केलेल्या चांगल्या नियोजनाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्यावतीने उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांचा सत्कार केला.तब्बल 15 हजार हुन अधिक लोकांनी फीड बॅक केल्याचे समजते.
सातारा शहर यावर्षी स्वच्छ भारत सर्व्हेक्षण 2020 मध्ये अव्वल येण्यासाठी सर्व तयारी केली होती.वर्षभर सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्या बरोबरच आरोग्य विभागाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, यादव, गणेश टोपे यांच्यासह सर्वच कर्मचायांनी काम केले.पालिकेचे नगराध्यक्ष माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर, बांधकाम सभापती मिलिंद काकडे, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे यांनी ही आपले शहर अव्वल येण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू ठेवले.फीडबॅक करण्यासाठी दि.31जानेवारी पर्यंत नौदणी करण्याची मुदत होती.पालिकेच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिकांकडून फीड बॅक करून घेण्यात येत होते.तसेच गर्दीच्या ठिकाणी ही पालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत होते.सातारा शहरातील अनंत इंग्लिश स्कुल, न्यू इंग्लिश स्कुल याच बरोबर छत्रपती शिवाजी कॉलेज, धनंजयराव गाडगीळ कॉलेज, कला वाणिज्य महाविद्यालय, एलबीएस कॉलेज, आझाद कॉलेज, कन्या महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालय यांच्या क्लासेस मध्येही फीड बॅक नौदणी करण्यात आली.दररोज दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात येत होते.सातारा पालिकेला चांगला प्रतिसाद फीड बॅक करण्यासाठी नागरिकांनी दिला.सुमारे 15 हजार हुन अधिक जणांनी फीड बॅक केल्याचे समजत









