प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरामध्ये सर्व सेवा पुरवठादार व्यक्तीकरीता फिरते कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. दोन दिवसात भाजी मंडईमधील ६३ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यामध्ये एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आलेला आहे.
सर्व लोकांनी कोरोना चाचणी करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.









