प्रतिनिधी / सातारा
कोरोना विषांणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांत मिनाज मुल्ला यांच्या केबिनमध्ये आज दुपारी झालेल्या बैठकीत शहरातील भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्या दि.३ पासून शहरात व उपनगरात भाजी विक्री आणि फळ विक्री करताना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा आदेश मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी काढला आहे. त्यामुळे शहरात रस्तोरस्ती भरणारी मंडई शुक्रवारपासून बंद होणार आहे.
मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी काढलेला आदेश पुढीलप्रमाणे ज्याअर्थी, कोरोना विषांणुचा प्रादुर्भाव रोखणे व यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडुन अधिसुचना निर्गमित करुन राज्यामध्ये लॉकडाउन परिस्थिती लागु करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्र. ३ अन्वये जिल्हयामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ नुसार दिनांक ०१/०४/२०२० पासुन जमावबंदी आदेश पारीत करणेत आलेला आहे.
तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थान, मुख्याधिकारी, नगरपरिषद, पोलीस निरीक्षक, सातारा शहर, सातारा तालुका, शाहुपुरी पोलीस स्टेशन, सातारा, तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती, यांची उपविभागीय अधिकारी सातारा यांच्या दालनात दि. ०२ रोजी झालेल्या बैठकीमधील निर्णया नुसार दि.०३ ते पुढील आदेश होई पर्यंत सातारा शहर व त्रिशंकु परिसरातील मुख्य चौकात तसेच रस्त्यावर भाजी व फळ विक्री करिता बसणेस निबंध करणेचा निर्णय घेणेत आलेला आहे.
मी,मुख्याधिकारी शंकर गोरे मला प्राप्त अधिकारा नुसार सातारा शहर व त्रिशंकु भागामध्ये मुख्य चौकात तसेच रस्त्यावर व इतर ठिकाणी बसुन भाजी व फळ विक्री करणेस प्रतिबंध करत आहे. भाजी व फळ विक्रेत्यांनी पुर्वी प्रमाणे घरोघरी जाऊन शासनाच्या मार्गदर्शक सुचनाचे काटेकोरपणे पालन करुन भाजी व फळे विक्रीचा व्यवसाय करावयाचा आहे. उपरोक्त आदेशाचे पालन न केल्यास शासन निर्णय डीएमयु/२०२०/सीआर.९० डीआयएसएम-१ दिनांक १७/०४/२०२० मधील परिशिष्ट ३ मध्ये नमुद केलेप्रमाणे, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० भा.दं.वि. १८६० चे कलम १८८ व इतर कायदयातील लागु असलेल्या दंडात्मक तरतुदीनुसार करावाई करणेत येईल याची नोंद घ्यावी.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








