सातारा : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर उपसा योजनेचा विद्युत पुरवठा रात्री तीन तास खंडीत झाला होता. पहाटे विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या काही भागात सोमवारी पाणी पुरवठा होणार नाही, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पालिकेच्या वतीनेे करण्यात आले आहे.
पाचगणी शहर अंधारात, तीन ठिकाणी झाडे पडली
पाचगणी : पाचगणी शहरात रात्री तीन ठिकाणीझाडे पडल्याने संपूर्ण शहर अंधारात होते. टेबल लॅण्डकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच शॉपिंगसेंटर समोरील मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. संपूर्ण पांचगणी शहर अंधारात होते. सकाळी झाडांच्या फांद्या व तुटलेल्या विद्युत तारा दुरुस्तीचे काम महावितरण आणि पालिकेकडून सुरु होते.











