वाई / प्रतिनिधी
व्याजवाडी ता वाई येथे काँगेस अन भाजपला खिंडार पडले असून अनेक दिग्गजांनी आ.मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. व्याजवाडी ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात नव्हती.या ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून या पार्श्वभूमीवर या प्रवेशाने राष्ट्रवादी फ्रंट फूट वर आली आहे.
सहयादी सहकारी बँक,मुंबईचे माजी संचालक उत्तमराव भोसले,व्याजवाडीचे माजी सरपंच संतोष पिसाळ,यशवंतराव सह. पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन दिलीप पिसाळ, युवा उद्योजक गणेश पिसाळ नारायणराव पिसाळ,जनार्दन पिसाळ, विलास पिसाळ,सर्जेराव मालुसरे, जितेंद्र पिसाळ,श्रीकांत कदम,सुधिर पिसाळ,अमित गोळे,प्रसाद पिसाळ,रामदास कुदळे,प्रज्वल पिसाळ,राहुल गोळे,सोहेल शेख,सागर पिसाळ,अशोक पिसाळ,आदींनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी आ.मकरंद पाटील,वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ,माजी सभापती दिलीपराव पिसाळ,वाई तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रमोद शिंदे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ,माजी उपसभापती मदन भोसले,उद्योजक अरविंदशेठ कुदळे,अशोक पाटील नितीन मांढरे आदी मान्यवरांसह व्याजवाडी येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी बोलताना आ.मकरंद पाटील म्हणाले,राष्ट्रवादी पक्षात आलेल्या प्रत्येकाला योग्य सन्मान दिला जाईल.त्यांच्या कर्तृत्वाचा वापर गावच्या विकासासाठी करून व्याजवाडीचा विकासाला शाश्वत गती देऊ.
व्याजवाडी गाव राष्ट्रवादीमय करण्यात वाई तालूका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ,उद्योजक अरविंदशेठ कुदळे यांनी निर्णायक भूमिका घेतली.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या दोघांनी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या व्याजवाडीत राष्ट्रवादी मजबूत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









